आज लक्ष्मीपुजन.....💐 यंदा लक्ष्मीपूजन करण्याचा उत्तम मुहूर्त सायंकाळी ६ वाजून १२ मिनिटांपासून ते रात्री ८ वाजून ३९ मिनिटांपर्यंत आहे. या प्रदोषकाली लक्ष्मी-कुबेर पूजन केल्याने आपल्या कुटुंबावर त्याचा सदैव आशीर्वाद राहील अशी माहिती खगोलशास्त्राचे गाढे अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ.सोमण यांनी दिली. अश्विन कृष्ण अमावास्येच्या मुहूर्तावर घरात कुटुंबातील सर्वांच्या उपस्थितीत ही पूजा करावी. यावेळी घरातील लक्ष्मी म्हणजेच धनाची विशेषत्त्वाने पूजा केली जाते. यावेळी देवाला आणि धनाला धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थांचा नैवेद्य दाखविला जातो. त्यानंतर तो प्रसाद म्हणून खाल्ला जातो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले अशी कथा आहे. प्रातःकाळी अभ्यंगस्नान करून देवपूजा, ब्राह्मणभोजन आणि प्रदोषकाळी (संध्याकाळी) सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, श्रीविष्णु इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा, असा लक्ष्मीपूजनाचा विधी आहे. अश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते, अशी आख्यायिका आहे. Diwali 📍 Event Diaries 😊😍😊💟 . . . ________________________ ✔Follow & tag us For More Pics ⤵👇 @omi_brand_photoghraphy ________________________ . . . . . . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ #omi_brand #diwali #india #indian #love #diwalidecor #festive #traditional #festival #onlineshopping #ethnic #indianwedding #fashion #deepavali #jewellery #decoration #pune #lakshmi #indianmomblogger #sangeet #homedecor #mumbai #indiansinlondon #handmade #interiordesign #festivalfashion #fabindianews #bhfyp #likeforlikes 😊😊😊😊 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
By Onkar Pore - 10:32 AM

via Instagram https://ift.tt/2Pgu7G2
0 Comments